Monday, June 1, 2015

ए आई..

आई..
ऊन्हाळा आहे तरी
मला तुझ्याच कुशीची ऊब हवी असते
काय मला रोज बाबाला घाबरून
आजीपाशी झोपायला पाठवत असतेस 
सांगना..


तुला नाही का ग 
मला कुशीत घ्यायच
गालावर हाळूच पापी घेऊन
लाडाने कुरवाळायच...


बाबा रागावतो
मी माझा एऱ्हवी तूला गोड वाटणारा चेहरा रडवेला करते
अन् निघून जाते
मला पर्याय नसतो
कारण मी लहान ..मी बाबाला घाबरते..
डोळ्यात पाणी साठवूनसुद्धा
काहीच उपयोग नसतो


मी जाते मुसू मुसू रडत
झोप येत नाही ग
अंधारात तुझीच वाट बघत असते
तू येशील
आणि मला कडेवर घेऊन
लाडाने घेऊन जाशील
ह्याच वेड्या आशेत मी अंधारात इकडे तिकडे पाहत बसते


कधी झोप लागते कळत नाही
सकाळ झाली की बाबा येतो
खुप लाड करतो
झोप अर्धवट होते
पण तू आल्यावर मलाही राहवत नाही
मी बाबावर चिडचिड करते
तो ही निघून जातो
हळूच पुन्हा तूझ्या मांडीवर 
माझा पुन्हा डोळा लागतो
माझा पुन्हा डोळा लागतो...


आई ....!!

6 comments: