Monday, May 18, 2015

अशीच साथ दे

तुझ्याशी लग्न झाला अन ..
एक नवीन आयुष्य सुरु झाल …
सुरुवातीचे काही दिवस, खूप स्वप्नवत होते….
कसे सरले कळलंच नाही …

एका सुखद निर्णयाने ..
एक चिमुकली परी राणी घरी आली
पुन्हा एक नवी सुरुवात नव्याने सुरु झाली
तिचे लाड करण्यात आणि काही दिवस सरून गेले
तू संसारात आणि तिच्यात रमून गेलिस…
आणि मी सोफ्यावर नेहमीसारखाच ……

लग्ना आधी होकार मिळे पर्यंत
एक वेगळच आयुष्य होत
ते तुझ्या मागे फिरणं ….
तू दिवसातून एकदा तरी दिसावीस म्हणून,
ते रोज तयार होऊन तुझ्या वाटेवर थांबण …
सुट्टी दिवशीसुद्धा तू येणार नाही हे माहिती असताना …
त्या वाटेवर वेड्या आशेत घुटमळण …
किती वेडेपणा तो…
पण आजही आठवल कि हसू येत…
पण ते हि आयुष्य जगण्यात एक सुख होत …

तुझ्या होकारा नंतरच आयुष्य तर …
एक स्वप्नाच होत जणू …
तुझ्या साठीच्या कविता
तुझ्या साठीची गिफ्ट्स
ते गाडीवर भटकण
शॉपिंग, सिनेमा अन ते बाहेरच खाण
कॉफी शॉप  मध्ये तासन तास गप्पा मारण …
खरच तू आणि मी
आपल्या आणि फ़क़्त आपल्या दोघांच ते आयुष्य होत….

आज तू आणि मी
आयुष्याच्या वळणावर नेहमीसारखच
हातात हात घालून चालतो आहे
रोज रोजच्या तुझ्या अन माझ्या धावपळीत
मी तुझाच होऊ पाहतो आहे ….


अशीच साथ दे…।।










Friday, May 8, 2015

गाणे माझे नसेल तरी

गाणे माझे नसेल तरी
ताल असेल
ताल नसला तरी
शब्द असतील
शब्द नसले तरी
भावना असतील
भावना नसल्या तरी … 
ते ओठांवर असेल
ओठांवर नसले तरी
मनातील असेल
मनात नसले तरी
पानावर असेल
पानावर नसले तरी
ते तुझ्याच साठी असेल….

जरी ते सुरेल नसेल :)

आज माझ्याकडे जुने शब्द नसतील …

आज माझ्याकडे जुने शब्द नसतील
पण भावना त्याच असतील
तुझ्यावर निखळ प्रेम करण्याच्या ….

प्रेमापलीकडले नाते आपुले
शब्दापलीकडली भाषा
डोळ्यांच्या भाषेत तूतूच जगण्याची आशा

नाही उरला तितका वेळ
कुशीत तुझ्या निजण्याचा
शांत तरीही तू अन मी डोहात अखंड प्रेमाच्या

संसार हा सुखाचा
तुझ्या शुद्ध प्रेमाचा
स्पर्श तुझ्या असण्याचा, श्वास तूच, तूच आधार माझ्या जगण्याचा

किती शब्द जुळवू
संपणार प्रेम हे
सुंदर स्वप्न माझ, तुझ्या सवे आयुष्य हे …

पहिल पान अन शेवटाल पान

पहिल पान अन शेवटाल पान
लिहिणाऱ्याला कसलं भान

पहिल्या पानावर अक्षर छान 
 शेवटच्या पानावर मनच रान

वेडया वाकडया रेषा
चित्र विचित्र आकार
शेवटच्या पानावर
मात्र मनाचाच उकार

पहिल्या पान ओळख पटविल
शेवटच पान ओळख सांगील

मन ओतून दया
ते ओतून घेईल
शेवटच पान  ते

मन मोकळ करायला जागा देईल

तुझ्या असण्यानं

तुझ्या असण्यानं
माझं अस्तित्व आहे
तुझ्या नसण्यानं
माझं जगण व्यर्थ आहे
तू असून माझ्या जवळ नसण्यानं
जीव व्याकूळ आहे
तू येशील ह्या आशेन
मी अजून जिवंत आहे

द्यायचे होते न सांगता

द्यायचे होते न सांगता
प्रेम माझे तिला
पण डोळ्यांची भाषा न बोलता सांगून गेली...

द्यायचे होते न सांगता
नव्हते जे माझ्याकडे
पण नसताना काही माझ्याकडे तिच सारं देऊन गेली...

साकारायचे  होते न सांगता
स्वप्न जे पडलेले
पण ती आयुष्यात आली आणि सारी स्वप्नच  आपोआप  साकारत गेली...

द्यायचे होते न सांगता
आयुष्य माझे सारे
पण तिच माझं पूर्ण आयुष्य होऊन गेली...

शब्द

शब्द
काही  मनाजोगे
काही  मनाविरुद्ध
मनाजोगे  पाडती प्रेमात
मनाविरुद्ध  करती  दूर.......
शब्द
काही  अर्थ  असणारे
काही  फ़क़्त  शब्द
अर्थ  तू  जो  देशील  अन  जो  मी  घेईन तो
फ़क़्त  शब्द  को-या  पानासारखा........
शब्द
काही  भाव  असलेले
काही  कवीच्या  मनातले
भाव  कळला  तर  तो  शब्द
कवीच्या  मनातला  तर  न  उलघडणारा......
शब्द
काही  प्रेमळ
काही  दुखावणारे
प्रेमळ  कमी  अस्तित्वाचे
दुखावणारे  राहती  खुण होऊनी .....
 ----- मध



फक्त तू

स्पर्श तुझा रेशमाचा नाजुक मऊ हातांचा
येशी कवेत जेव्हा मी पूर्ण होतो त्यांचा
का वेड मज हे तुझ्या अभ्रकी नयनांचे
सुचते न मज काही पाहता रूप त्यांचे
स्पंदने ही थांबती पाहता तव ओठांना
स्पर्शतो जसा मी जणू मखमली फुलांना ...!!
----------------------------------------------------------------------------------------------
रात्र बहरलीय, तू गेलीस झोपी की अजुन माझी आठवण येतेय ||
इथं मात्र, माझ्या खांद्यांच्या तुझ्या ऊशिला तुझ्याच डोक्याचा भास होतोय ||
हळुच लाडत येऊन तुझ ते माझ्या कनाला चावण आठवून मी हसतोय ||
फुललेल्या चांदण्यांची रात्र तुझ्याशिवाय फक्त तुझ्या आठवणीतच घालवतोय ||
कधी येशील ..!!
-------------------------------------------------------------------------------------------------
मी माझा,
कि
मी तुझा,
कि
तुझ्या रेशमी केसांचा,
तुझ्या मृदू शब्दांचा,
तुझ्या नक्षत्री नयनांचा,
तुझ्या गुलाबी ओठांचा,
तुझ्या कोमल स्पंदनांचा,
तुझ्या लाडिक रागाचा,
तुझ्या स्मिथ हसण्याचा,
तुझ्या नाजूक स्पर्शाचा,
तुझ्या प्रत्येक श्वासाचा,
सांग ना मी माझा कि मी तुझा. .  !! 
---------------------------------------------------------------------------------------
कोणीतरी हवं आहे.....
चोर नजरेन पाहून लाडिक हसणारं ...
हक्कानं खांद्यावर डोकं ठेवणारं ....
कोणीतरी हवं आहे ....
उशीर झाला म्हणून उगाच रागावणार ...
एका प्रेमळ स्पर्शानं लगेच मिठीत येणारं ...
कोणीतरी हवं आहे ....
प्रेम करणारं ....
माझ्या आणि माझ्याच आठवणीत राहणार ....
कोणीतरी हवं आहे ...
मला समजून घेणारं ....
चुकल्यास हक्कानं माझ्यावर ओरडणार ...
कोणीतरी हवं आहे ...
सतत सोबत असणार...
मनाच्या प्रत्येक कोप-यात झिरपणार ....
कोणीतरी हवं आहे ....
माझं ऐकून घेणारं ...
कंटाळा आला असला तरी आवडीन ऐकणारं ..
कोणीतरी हवं आहे ...
मला फोन करून त्रास देणारं ...
माझ्या फोनची आतूरतेन वाट पाहणारं ...
कोणीतरी हवं आहे ....
खरंच कोणीतरी हवं आहे .....
----------------------------------------------------------------------------------------------
अजून आठवणींचे ठसे हृदयी माझ्या
पुसता न पुसे ती खुण अजून आहे तिथे
अजून डोळ्यातील पाण्याचे व्रण गालावर माझ्या
आठवणीत तुझ्या ती अजून दाट होते
-------------------------------------------------------------------------------------------------
न्हायल्या केसातील पाणी गुलाबी गालावर ओघळते ....
स्पर्श करण्या तव गालांना रविकिरण हि तळमळते ....
देखणे रूप तुझे पाहुनी हे मन माझे का डळमळते ....
त्या थेंबा परी पूर्ण मुरावे अशी कल्पना मग सुचते ....
-------------------------------------------------------------------------------------------
कुणी ना इतके जवळ माझ्या ..
कुणा ना इतकी आठवण माझी ...
कुणा ना कळे असे दुख: माझे ...
कुणास सांगू मी कोणीही ना माझे ...
कुणा अंतरी असेल स्वप्न माझे ...
कुणाचा छंद वेड्या मनास माझ्या ....
कुणा साठी हे पाणी डोळ्यात माझ्या ..
कुणी सापडेना भोवती अंधार माझ्या ...
कुणाचा पडेल हात हाती माझ्या ...
कुणास आवडेल असे आयुष्य माझे ...
कुणा साठी हे असे जगणे माझे ..
कुणी उत्तरेना असे प्रश्न माझे ?
-------------------------------------------------------------------------------------------------
चिंब भिजलोय तुझ्या प्रेमात नको दूर जाऊस ......
अखंड वाहिन तुझ्याचसाठी नको दूर जाऊस .....
मी तुझा, श्वास तुझा, प्राण तुझे, शब्द तुझेच ओठी माझ्या ....
तू नसता मातीमोल मी नको ना दूर जाऊस .... :(
-------------------------------------------------------------------------------------------------
गोड गुलाबी सकाळ हि तुझ्या रुपात न्ह्याली ग ...
केस मोकळे तुझे उडवी गार वारा उनाड ग ...
स्वागत करण्या फुले उमलली सुगंध त्यांना तुझाच ग ...
नशिबी यावी अशी सकाळ हि ह्या वेड्याची वेडी आशा ग .....
_____________________________________
का प्रत्येक क्षणाला तुझाच आभास ...
का सारखं तुझ्याशी बोलाव हा ध्यास ...
का डोळे मिटल्यावर तुझेच प्रतिबिंब ...
का तुझ्या प्रेमात मी इतका चिंब ?????
_____________________________________
चिंब पाऊस ...
ती माझ्या मिठीत अन्,
माझी मिठीच तीच जग ...!!
_____________________________________
रात्रीचे चांदणे तुझ्याचसाठी ....
चंद्र पोरका तुझ्याचसाठी ....
रातराणीचा सुगंध तुझ्याचसाठी ...
सुंदर स्वप्नांची बहार तुझ्याचसाठी ..
फक्त तू झोपी जा ....!!
_____________________________________
चंद्र कोरा नभी तव रंगात नाहतो ..
पाहता तुज अंतरी हा स्पर्श कैसा गर्भतो ..
चंद्र कोरा नभी तव रंगात नाहतो ..
कोर चंद्रासम बटांची घोर जिवासी लावते ...
देई लटका मानेस की मी पूर्णतः वेडावतो ...
चंद्र कोरा नभी तव रंगात नाहतो ..
दोन ही नक्षत्र सुमने पाहुनी मज का लाजती ..
देखुन अनदेखा बहाना मी तुझा हा जाणतो ...
चंद्र कोरा नभी तव रंगात नाहतो ..
चंद्र कोरा नभी तव रंगात नाहतो ..
पाहता तुज अंतरी हा स्पर्श कैसा गर्भतो ..
चंद्र कोरा नभी तव रंगात नाहतो ..
- मध

कोणीतरी हवं आहे

कोणीतरी हवं आहे.....
चोर नजरेन पाहून लाडिक हसणारं ...
हक्कानं खांद्यावर डोकं ठेवणारं .... 
कोणीतरी हवं आहे ....
उशीर झाला म्हणून उगाच रागावणार ...
एका प्रेमळ स्पर्शानं लगेच मिठीत येणारं ...
कोणीतरी हवं आहे ....
प्रेम करणारं .... 
माझ्या आणि माझ्याच आठवणीत राहणार ....
कोणीतरी हवं आहे ...
मला समजून घेणारं ....
चुकल्यास हक्कानं माझ्यावर ओरडणार ...
कोणीतरी हवं आहे ...
सतत सोबत असणार...
मनाच्या प्रत्येक कोप-यात झिरपणार .... 
कोणीतरी हवं आहे ....
माझं ऐकून घेणारं ...
कंटाळा आला असला तरी आवडीन ऐकणारं .. 
कोणीतरी हवं आहे ...
मला फोन करून त्रास देणारं ...
माझ्या फोनची आतूरतेन वाट पाहणारं ...
कोणीतरी हवं आहे ....
खरंच कोणीतरी हवं आहे .....

मी माझा, कि मी तुझा

मी माझा,  
कि  
मी तुझा,
कि
तुझ्या रेशमी केसांचा, 
तुझ्या मृदू शब्दांचा, 
तुझ्या नक्षत्री नयनांचा, 
तुझ्या गुलाबी ओठांचा, 
तुझ्या कोमल स्पंदनांचा, 
तुझ्या लाडिक रागाचा,
तुझ्या स्मिथ हसण्याचा, 
तुझ्या नाजूक स्पर्शाचा, 
तुझ्या प्रत्येक श्वासाचा, 
सांग ना मी माझा कि मी तुझा. .  !!

रात्र बहरलीय

रात्र बहरलीय, तू गेलीस झोपी की अजुन माझी आठवण येतेय ||
इथं मात्र, माझ्या खांद्यांच्या तुझ्या ऊशिला तुझ्याच डोक्याचा भास होतोय ||
हळुच लाडत येऊन तुझ ते माझ्या कनाला चावण आठवून मी हसतोय ||
फुललेल्या चांदण्यांची रात्र तुझ्याशिवाय फक्त तुझ्या आठवणीतच घालवतोय ||
कधी येशील ..!!

क्षण क्षण मोजतोय

क्षण क्षण मोजतोय कधी मी भेटेन तुला
तुझा नाजूक हात हातात घेऊन वचन द्यायचं आहे मला ..
क्षण क्षण मोजतोय कधी मी भेटेन तुला
तुझ्याकडे वेड्यासारख एकटक पाहात बसायचं आहे मला ...
क्षण क्षण मोजतोय कधी मी भेटेन तुला
तुला पाहून तुझ्यात हरवून जायचं आहे मला .....
क्षण क्षण मोजतोय कधी मी भेटेन तुला
तुझ ते मृदू बोलण ऐकण्यात रमून जायचं आहे मला ...
क्षण क्षण मोजतोय कधी मी भेटेन तुला  
तुझ्या रेशमी केसातून हात फिरवायचा आहे मला ..
क्षण क्षण मोजतोय कधी मी भेटेन तुला 
तुझ्या ह्या वेड्याला त्याच आयुष्य भेट द्यायचा आहे तुला
क्षण क्षण मोजतोय कधी मी भेटेन तुला 



-- तुझा फ़क़्त तुझाच  वेडा

सांग मी काय करू ....

तू कामात असतेस ...
मला ते कळतंय ...
पण ह्या वेड्या मनाला तुझ्याशी सारखं बोलायचं आहे ...
म्हणून ते मला छळतंय  ..... 
सांग मी काय करू ........... 
झोप येत नाही ..
डोळे मिटले कि तुझ्या कोमल स्पर्शाचा भास होतोय ..
अन झोप उडून जातेय ...
सांग मी काय करू ...
डोक्यात तुझेच विचार ...
डोळ्यासमोर तूच तू असतेस ...
काय करतोय काही काळात नाही ...
सांग मी काय करू ....

कसे सांगू ...

कसे सांगू मी तुला किती प्रेम आहे ...
विचारी मना तूच शोधुनी पाहे...

खुप त्रास दिलास आता हात देना....
सार्थ होइल जगणे ह्या गरीबाची होना......


का हे अस?

का हे अस?
कळतंय तुला पण अजून तुझा होकार नाही ..
का हे अस?
तुझ माझ्यावरच प्रेम मला कळत नाही ..
का हे अस?
तुला अजून वेळ हवाय ...
का हे अस?
इथ मात्र एक एक क्षण वर्षासारखा झालाय ...
का हे अस?
तुला जगाचा विचार आहे
का हे अस?
मला फ़क़्त तुझाच विचार आहे 
का हे अस? का हे अस?


मी आहे .... फ़क़्त तुझ्याचसाठी

रात्र जागतेय माझ्या सोबत आठवणीत तुझ्या .....
का आठवण माझी तुला येत नाही ....
अर्पण केले आयुष्य पदरी मी तुझ्या ....
अजून होकाराची चाहूल का येत नाही ...
_____________________________________________________________

आता कुठे पारिजात फुलतोय, नको घाव घालू  ......
सुमने फुलतील तुझ्याच साठी ....
पायी असतील काही, काही हाती कोमल तुझ्या ...
अंतरंगातून सदा फुलेन तुझ्याच साठी, नको घाव घालू ......
आता कुठे पारिजात फुलतोय, नको घाव घालू  ...... 
 
मी आहे .... फ़क़्त तुझ्याचसाठी