Wednesday, July 15, 2015

सोबत नेशील काय रे सांग !

आहे म्हणून 
माज नको
ठेव जरास भान
गेलास उद्या जर
सोबत नेशील काय रे सांग

नाव ना किर्ती
ना काही केलस दान
गेलास उद्या जर 
सोबत नेशील काय रे सांग 

एकच आयुष्य 
म्हणता म्हणता
नको करू पैशांचा नाश
गेलास उद्या जर 
सोबत नेशील काय रे सांग

असेल काही देण्या जोगे
देऊन कर जरा भल काम
गेलास उद्या जर
सोबत नेशील काय रे सांग

नकोस होऊ उदार इतका
करतील सारे घात
जरा लांबच रहा रे
झालाय माणुसकीचा ऱ्हास 

पैश्या मागे धावू नको रे 
राहशील एकटा
फक्त राहील पैश्यांचा आधार
गेलास उद्या जर
सोबत नेशील काय रे सांग





Monday, June 1, 2015

ए आई..

आई..
ऊन्हाळा आहे तरी
मला तुझ्याच कुशीची ऊब हवी असते
काय मला रोज बाबाला घाबरून
आजीपाशी झोपायला पाठवत असतेस 
सांगना..


तुला नाही का ग 
मला कुशीत घ्यायच
गालावर हाळूच पापी घेऊन
लाडाने कुरवाळायच...


बाबा रागावतो
मी माझा एऱ्हवी तूला गोड वाटणारा चेहरा रडवेला करते
अन् निघून जाते
मला पर्याय नसतो
कारण मी लहान ..मी बाबाला घाबरते..
डोळ्यात पाणी साठवूनसुद्धा
काहीच उपयोग नसतो


मी जाते मुसू मुसू रडत
झोप येत नाही ग
अंधारात तुझीच वाट बघत असते
तू येशील
आणि मला कडेवर घेऊन
लाडाने घेऊन जाशील
ह्याच वेड्या आशेत मी अंधारात इकडे तिकडे पाहत बसते


कधी झोप लागते कळत नाही
सकाळ झाली की बाबा येतो
खुप लाड करतो
झोप अर्धवट होते
पण तू आल्यावर मलाही राहवत नाही
मी बाबावर चिडचिड करते
तो ही निघून जातो
हळूच पुन्हा तूझ्या मांडीवर 
माझा पुन्हा डोळा लागतो
माझा पुन्हा डोळा लागतो...


आई ....!!

Monday, May 18, 2015

अशीच साथ दे

तुझ्याशी लग्न झाला अन ..
एक नवीन आयुष्य सुरु झाल …
सुरुवातीचे काही दिवस, खूप स्वप्नवत होते….
कसे सरले कळलंच नाही …

एका सुखद निर्णयाने ..
एक चिमुकली परी राणी घरी आली
पुन्हा एक नवी सुरुवात नव्याने सुरु झाली
तिचे लाड करण्यात आणि काही दिवस सरून गेले
तू संसारात आणि तिच्यात रमून गेलिस…
आणि मी सोफ्यावर नेहमीसारखाच ……

लग्ना आधी होकार मिळे पर्यंत
एक वेगळच आयुष्य होत
ते तुझ्या मागे फिरणं ….
तू दिवसातून एकदा तरी दिसावीस म्हणून,
ते रोज तयार होऊन तुझ्या वाटेवर थांबण …
सुट्टी दिवशीसुद्धा तू येणार नाही हे माहिती असताना …
त्या वाटेवर वेड्या आशेत घुटमळण …
किती वेडेपणा तो…
पण आजही आठवल कि हसू येत…
पण ते हि आयुष्य जगण्यात एक सुख होत …

तुझ्या होकारा नंतरच आयुष्य तर …
एक स्वप्नाच होत जणू …
तुझ्या साठीच्या कविता
तुझ्या साठीची गिफ्ट्स
ते गाडीवर भटकण
शॉपिंग, सिनेमा अन ते बाहेरच खाण
कॉफी शॉप  मध्ये तासन तास गप्पा मारण …
खरच तू आणि मी
आपल्या आणि फ़क़्त आपल्या दोघांच ते आयुष्य होत….

आज तू आणि मी
आयुष्याच्या वळणावर नेहमीसारखच
हातात हात घालून चालतो आहे
रोज रोजच्या तुझ्या अन माझ्या धावपळीत
मी तुझाच होऊ पाहतो आहे ….


अशीच साथ दे…।।










Friday, May 8, 2015

गाणे माझे नसेल तरी

गाणे माझे नसेल तरी
ताल असेल
ताल नसला तरी
शब्द असतील
शब्द नसले तरी
भावना असतील
भावना नसल्या तरी … 
ते ओठांवर असेल
ओठांवर नसले तरी
मनातील असेल
मनात नसले तरी
पानावर असेल
पानावर नसले तरी
ते तुझ्याच साठी असेल….

जरी ते सुरेल नसेल :)

आज माझ्याकडे जुने शब्द नसतील …

आज माझ्याकडे जुने शब्द नसतील
पण भावना त्याच असतील
तुझ्यावर निखळ प्रेम करण्याच्या ….

प्रेमापलीकडले नाते आपुले
शब्दापलीकडली भाषा
डोळ्यांच्या भाषेत तूतूच जगण्याची आशा

नाही उरला तितका वेळ
कुशीत तुझ्या निजण्याचा
शांत तरीही तू अन मी डोहात अखंड प्रेमाच्या

संसार हा सुखाचा
तुझ्या शुद्ध प्रेमाचा
स्पर्श तुझ्या असण्याचा, श्वास तूच, तूच आधार माझ्या जगण्याचा

किती शब्द जुळवू
संपणार प्रेम हे
सुंदर स्वप्न माझ, तुझ्या सवे आयुष्य हे …

पहिल पान अन शेवटाल पान

पहिल पान अन शेवटाल पान
लिहिणाऱ्याला कसलं भान

पहिल्या पानावर अक्षर छान 
 शेवटच्या पानावर मनच रान

वेडया वाकडया रेषा
चित्र विचित्र आकार
शेवटच्या पानावर
मात्र मनाचाच उकार

पहिल्या पान ओळख पटविल
शेवटच पान ओळख सांगील

मन ओतून दया
ते ओतून घेईल
शेवटच पान  ते

मन मोकळ करायला जागा देईल

तुझ्या असण्यानं

तुझ्या असण्यानं
माझं अस्तित्व आहे
तुझ्या नसण्यानं
माझं जगण व्यर्थ आहे
तू असून माझ्या जवळ नसण्यानं
जीव व्याकूळ आहे
तू येशील ह्या आशेन
मी अजून जिवंत आहे