Friday, February 13, 2009

काय करशील ?

भोवती आठवनिंची किती गर्दी करशील ??
भिजलेल्या क्षणांना किती ओल करशील ??
खुप केलेस हाल आणि किती करशील ??
संपेन जेव्हा मी सांग काय करशील ?

कुठे गेलीस...

कुठे गेलीस मला अस एकट सोडून....
घालमेल होते ग जीवाची तुझा स्टॉप आल्यावर....

आज परत तू आली नाहीस..
आज परत तू आली नाहीस....
वाटल इथच उतरावं...
थोडावेळ तुझी वाट बघून नंतरच्या बस नी जावं...
नंतर वाटल तू गेली असशील ....
नंतर वाटल तू गेली असशील ....
ह्याच बसनी जाऊन तुला लास्ट स्टॉप वर पहावं...

पण आज तू दिसली नाहीस.........
जीवाची घालमेल काही थांबली नाही..........

ऑफिसमधे पोहचलो, म्हंटल संध्याकाळी दिसशील........
स्टॉपवर आलो परत तू नव्हतीस....

अचानक काय झाल...
अचानक काय झाल...
कुठे गेलीस मला असा एकट सोडून...
घालमेल होते ग जीवाची तुझा स्टॉप आल्यावर......

स्वार्थ

जेव्हा बंद तुटले.....
जेव्हा बंद तुटले.....
ती पिशवी मी पुन्हा बाजारात न्हेली नाही......

संकटात होतो जेव्हा....
संकटात होतो जेव्हा....
संकटकाळी बाहेर जायची खिड़किच उघडली नाही.....

कवि

आमची कविता लोकांना आवडत नाही.....
आमची कविता लोकांना आवडत नाही.....
आम्हालाही कविता केल्या शिवाय राहवत नाही...
आम्हालाही कविता केल्या शिवाय रहावत नाही...

कविता करणाराचें असेच हाल असतात.....
कविता करणाराचें असेच हाल असतात.....
पण एक कळत नाही त्याना कविता कश्या आणि का सुचतात?????

Tuesday, February 3, 2009

क्षण / ध्यास

हसून घालवलेले क्षण पुन्हा आठवतात...
दुःखाचा निखारा पुन्हा का फुलवतात ????

सोडून दिलेला ध्यास पुन्हा जडतो....
नाही म्हंटल तरी मी सारखा प्रेमात का पडतो ?????